यांचा सेक्युलरिझम् म्हणजे केवळ हिंदुद्वेष!
बंगलोरला येत असताना, नागपूर ते मद्रास या प्रवासात आजचा सुधारकचा मे १९९७ चा अंक वाचला. या अंकात श्री अविनाश भडकमकर नावाच्या सद्गृहस्थाचा ‘‘धर्मनिरपेक्षतेला आव्हान’ या शीर्षकाचा लेख आहे. लेखकाचा आव तात्त्विक चर्चा करण्याचा असला, तरी त्यांचा खरा हेतु भारतीय जनता पार्टीला झोडपून काढण्याचा दिसून येतो. तत्त्वचिंतन कमी आणि पूर्वग्रह अधिक अशा लेखाला तात्त्विक म्हणावे किंवा …